( चिपळूण )
बहादूरशेख नाका डॉ. आंबेडकर चौकातील निर्माण होत असलेल्या पुलाचा भाग कोसळून मोठी वित्तहानी झाली आहे. याला जबाबदार म्हणून यावरील सर्वोच्च लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह संबंधित ठेकेदार, संबंधित मुख्य अभियंता सा. बां. प्रदेश विभाग, अधीक्षक अभियंता सा. बां. मंडळ व कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग रत्नागिरी आणि ब्रिज डिझाईन इंजिनियर यांच्याविरोधात चिपळुणातील नागरिक तानू आंबेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे.
येथील पोलिस ठाण्यात त्यांनी या संदर्भात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. आंबेकर यांनी याबाबत चिपळूण पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना दिलेल्या पत्रानुसार नवीन पूल कोसळल्याप्रकरणी फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.