हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतू, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि.२७ एप्रिल २०२१ रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.