(चिपळूण)
टायर, ट्युब फ्लॅप असे ३९ हजार ५०० रुपयांची खरेदी केल्यावर दुकानदाराला बँकेचा बंद असलेल्या खात्याचा धनादेश देऊन फसवणूक केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित अशोक कोलगे (कापसाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना १५ सप्टेंबरला शहरातील बहादूरशेख नाका येथे ओंकार टायर्स दुकानात घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर बजरंग जाधव (४६, बहादूरशेख नाका) याच्या ओंकार टायर्स या दुकानात जाऊन संशयित अभिजित याने दोन टायर व दोन ट्युब दोन फ्लॅप असे ३९ हजार ५०० रुपयांचे साहित्य खरेदी केले. संशयित अभिजित कोलगे याने बँकेच्या खात्याचा धनादेश देऊन सागर जाधव यांची ३९ हजार ५०० रुपयाची फसवणूक केली. हा प्रकार जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली