(रत्नागिरी)
पाली बाजारपेठेत भाजी आणण्यासाठी गेलला वृद्ध चक्कर येऊन पडला. उपचारासाठी प्रथम खासगी त्यानंतर कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय नारायण पंडित (वय ६२, रा. सोनारवाडी नाणीज, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंडित भाजी आणण्यासाठी पाली येथून चालत येत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांचा भाऊ जयवंत पंडित व इतर ग्रामस्थांनी उपचारासाठी बांबरफाटा येथील सरकारी रुग्णालयात नेले. अधिक उपचारासाठी त्यांनी कोल्हापूर येथे दाखल केले होते