(खेड)
खेड शहरासह भरणे परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्डयांवर छापे टाकून ३२ हजारांच्या मुद्देमालासह ९ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहरातील एसटी बसस्थानक, पानगल्ली, बाजारपेठ, पावसकरनाका, शिवतररोड, मच्छी मार्केट, आनंद टॉकीज परिसरात गुरुवारी (१९ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली दोन ठिकाणी पथकांनी धाडी टाकल्या. शहरातील आनंद सीटी प्राइड येथील धाडीत २५,३०० रुपयांची रोकड जप्त करून पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या धाडीत महमद मरुडकर, अमित खेडेकर, मनोज घोडे, संजय सकपा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ते २४,३०० रुपयांची रोकड व जुगारा साहित्य हस्तगत करण्यात आले.
भरणे येथील छाप्यात ६,४७ रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित् जप्त करण्यात आले. धाडीत सुरे लोहार, क्रतुराज मेहता, नीलेश शिगव यांना ताब्यात घेण्यात आले..