(संगलट/इक्बाल जमादार)
खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने खेड तालुका कुमार /कुमारी अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2023 टीबीके महाविद्यालय भरणे येथील मैदानावर संपन्न झाली. स्पर्धेत तालुक्यातील 14 संघानी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमास खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतिश चिकणे, उपाध्यक्ष श्री महेश भोसले, श्री.भाई हंबीर, कार्याध्यक्ष श्री. समद बुरोंडकर, खजिनदार श्री.दाजी राजगुरू,भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पारकर, खेड तालुका कब्बडी असोसिएशन सचिव श्री.रवींद्र बैकर, सहसचिव श्री शरद भोसले, सदस्य श्री.दिलीप कारेकर, दादा बैकर, सुभाष आंबडे, श्री.अमोल दळवी, श्री.सुखदेव पवार, श्री.दीपक यादव श्री मंगेश खेडेकर, श्री. स्वप्नील सैतवडेकर, सौ.संपदा गुजराती, सुजित फागे, भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच संदीप खेराडे, सदस्य श्री.संतोष नलावडे, मधुकर शिंदे, रुपेश तरडे, संतोष शिर्के, निलेश खेराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव ऍड. श्री. तु. ल. डफळे साहेब, टीबीके कॉलेजचे प्राचार्य श्री. साळुंखे, श्री. सोनवलकर यांनी स्पर्धेला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे संघ विजेता तर श्रीकृष्ण भडगाव संघाने उपविजेते पद पटकविले. पारितोषिक वितरण कार्यक्रम भरणे ग्रामपंचायत श्री.महेश जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून पांडुरंग विटमल, तर पंच म्हणून आशुतोष साळुंखे, विलास बेंद्रे, संतोष शिर्के, शशिकांत भुवड, अमर चव्हाण, गणेश सानप, स्वप्नील बैकर, महेश मर्चंडे, दिनेश पदुमले यांनी काम पाहिले. छाननी समिती स्वप्नील बैकर, सुरज जाधव, महेश मर्चंडे तर निवड समिती भाई हंबीर, अमोल दळवी, विशाल खेडेकर यांनी भूमिका बजावली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सुरज जाधव राकेश बैकर, शुभम बिर्जे, रितेश बिर्जे, साहिल जड्याळ, विनय पाटील, विनायक फागे, यश धुमाळ, समीर शिंदे, आर्यन शिंदे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी संपन्न केल्याबद्दल सर्व खेळाडू व पंच यांचे खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सतीश चिकणे यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.