(नवी दिल्ली)
दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजेत्यांना प्रशस्तिपत्र आणि पदके देत सन्मानित केले. ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. दोन अभिनेत्रींना 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भट्ट आणि ‘मिमी’साठी क्रिती सेनॉन. तर अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 69 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलिया भट्ट पती आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत पोहोचली होती. आलियासाठी का क्षण खूपच खास होता. तिने या खास दिवशी चक्क 50 लाखांची साडी नेसली होती. या साडीचे रणवीरसोबत खास कनेक्शन आहे.
संजय लीला भन्साळीचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट गंगुबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्टने अप्रतिम अभिनय केला होता. आलियाला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी विज्ञान भवनात पोहोचली होती. हा दिवस अभिनेत्रीसाठी खूप खास असल्याने तिने यावेळी तिच्या लग्नाची साडी नेसली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील गंगूबाई म्हणजेच आलिया भट्ट आज क्लाउड नाइनवर आहे. या खास दिवशी तिने लग्नाची साडी निवडली. बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली बेज रंगाची साडी आलियाने परिधान केली होती. तिने यासोबत मॅचिंग कुंदन ज्वेलरी घातली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. प्रत्येकजण तिच्या लुक आणि ड्रेसिंग स्टाइलचे कौतुक करत आहे. आलिया भट्टचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे जो तिला गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
आलियाने याआधीही अनेकदा तिचे कपडे रिपीट केले आहेत. यावेळीही तिच्या लुकची चर्चा होती. तसंच या खास दिवशी तिच्यासोबत पती रणबीर कपूरही उपस्थित होता. पत्नीची साथ द्यायला त्याने आवर्जुन उपस्थिती लावली. संजय लीला भन्साळींची मात्र इथे आठवण येत असल्याचं आलियाने सांगितलं. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलियाने संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले. संजय लीला भन्साळी यांना मी कधीही विसरू शकत नाही, असे तिने सांगितले. त्यांच्यामुळेच ती आज या पदावर आहे. “गंगूबाई काठियावाडी’साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्या मनातील कृतज्ञता आणि संजय लीला भन्साळी यांचे विशेष आभार,” आलिया म्हणाली.
आलियाच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट संपादन असे पुरस्कार मिळाले आहेत. तर कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मिमी या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. या चित्रपटात क्रितीने एका डान्सरची भूमिका साकारली आहे जी नंतर सरोगेट मदर बनते आणि जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला घेण्यास नकार दिला तेव्हा ती तिचे करिअर विसरून मुलाला एकटी वाढवते. तर अल्लू अर्जुनला पुष्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही उपस्थित होती. पंकज त्रिपाठी यांना मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.