(रत्नागिरी)
तालुक्यातील कापडगाव- फणसवाडी येथील होमगार्डने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रथमेश राजाराम पाडावे (वय २५, रा. फणसवाडी, कापडगाव, रत्नागिरी) असे होमगार्डचे नाव आहे.
सदर घटना रविवारी (ता. १५) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. प्रथमेश पाडावे हा २०२१ च्या होमगार्ड भरतीमध्ये दाखल झाला होता. रत्नागिरी होमगार्डमध्ये कर्तव्य बजावत होता. त्याच्या लग्नालाही एक वर्षे दोन महिने झाले होते. रविवारी दुपारी त्याने घरातील बेडरुमच्या वाश्याला नायलॉनची दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाली दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात प्रथमेशचे वडील राजाराम पाडावे यांनी खबर दिली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कांबळे व मोहन कांबळे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. सायंकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.