(देवरूख / प्रतिनिधी)
कसबा व धामापूर जि.प. गटातील युवकांना उद्योग विषयी माहिती देण्यासाठी मयुरेश मादुस्कर यांच्या माध्यमातून मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत स्वंयरोजगार निमिर्तीसाठी शासनाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळाभाजपा तालुका उत्तर विभागाचे अध्यक्ष विनोद म्हस्के व तालुका सरचिटणीस मिथुन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमेश्वर आय टी सेल तालुका अध्यक्ष (उ) मयूर निकम यांनी आयोजित केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
तसेच धामापूर जिप गटातील नागरीकांच्या इ केवायसी करणेसाठी कँम्पचे आयोजन करणेत आले होते. यात ग्रामीण भागातील अनेक शेतकरीवर्गासह सामान्यांना इ केवायसी पुर्ण करून देणे आली. यासाठी बँकेचे रानडे, गणेश साठे व मयुर निकम यांनी मेहनत घेवून ग्रामीण भागातील जनतेला कँम्प घेवून सुविधा दिल्याने त्यांचे आभार मानले.