(जैतापूर / वार्ताहर)
यावर्षी संपन्न झालेल्या गणेशोत्सव काळात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून जवळपास 650 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. त्यातून राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय तर प्रत्येक जिल्हास्तरावर एक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे सांस्कृतिक कार्य आणि वने मंत्रालयाचे मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तसेच सर्व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागातील जैतापूर येथील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र आणि पंचवीस हजार रुपये चा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
फोटो :मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, आणि प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना जैतापूर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी