(रत्नागिरी)
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये कार्यरत असलेल्या कृषिरत्न व कृषी पुत्र या दोन गटांनी अझोला निर्मिती या विषयावर दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी प्रात्यक्षिक घेतले. या प्रात्यक्षिकावेळी शेतकऱ्यांना अझोला ची निर्मिती कशी करावी यावर सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये कुठच्या पद्धतीचा खड्डा खणने आवश्यक आहे व त्यासोबतच अझोलाच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये, जशी की शेण, SSP त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी व मृदा इत्यादी घटकांवर ती माहिती देण्यात आली. अझोला निर्मितीसाठी किती प्रमाणात अझोला कल्चर विकत घ्यावे व ते कुठे उपलब्ध होऊ शकेल याची देखील माहिती त्यांना देण्यात आली. या प्रात्यक्षिकादरम्यान अझोलाचे विविध वापर व अझोलाची उपयुक्तता समजावून सांगण्यात आली एक उत्तम हिरवळीच खत तसेच रासायनिक खताला विकल्प आहे असे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ.आनंद हणमंते, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुदेश चव्हाण व कृषी विज्ञान केंद्र(KVK), लांजा आणि डॉ. संदिप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.