(देवरूख / सुरेश सप्रे)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नोलॉजीच्या मेकॅनिकल विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाले असल्याची माहीती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. असा बहुमान मिळविणारे कोकण विभागातील पहीले महाविद्यालय ठरले आहे. या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून महाविद्यालयाचे विशेष कौतुक होत आहे.
विविध अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणे व त्यांची निर्धारित निकषांनुसार मुल्यांकन करणे या उद्देशाने एनबीए कार्यरत असून त्यानुसार मंडळावरील शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती, डायरेक्टर्स, विद्यापीठांचे उप कुलपती, राज्य व केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यामार्फत अर्ज केलेल्या महाविद्यालयांमध्ये विभागवार तपासणी करण्यात येते. यावेळी ए आय सी टी इ चे नियम व मानके यांची योग्यप्रकारे अंमलबजावणीची सत्यता पडताळून पाहण्यात येते व मानांकन दिले जाते. या सर्व प्रक्रियेद्वारे परिणाम आधारित शिक्षण पद्धती राबविण्यात येत असून मानांकन प्राप्त महाविद्यालयामधून निर्माण होणारे पदवीधर विद्यार्थी रोजगारक्षम व उद्योग क्षेत्रासाठी योग्य उमेदवार असतील याची खात्री करण्यात आल्यावरच मानांकन दिले जाते.
महाविद्यालयामध्ये एनबीए च्या तज्ञ समितीने दिलेल्या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे व्हिजन, मिशन, मेकॅनिकल विभागाची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रम, महाविद्यालयामधील अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, आउटकम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सहशैक्षणिक कामगिरी, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व योगदान अशा सुमारे दहा प्रकारच्या निकषांतर्गत प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विभागातील विद्यार्थ्यांशी सलग्न सोयी सुविधा, प्रथम वर्ष विभाग, प्रशासकीय सेवा सुविधा, संस्था स्तरावरील आधारभूत मदत आणि आर्थिक स्त्रोत याही गोष्टी सखोल तपासण्यात आल्या.
एनबीए च्या या तज्ञ समितीमध्ये प्रो. एन. सिवा प्रसाद (समितीप्रमुख), प्र कुलगुरू, जी आय टी ए एम युनिवर्सिटी, हैद्राबाद, डॉ. व्ही. वेणुगोपाल रेड्डी, प्रोफेसर, जे एन टी यु ए कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आंध्रप्रदेश आणि डॉ. पियुष गोहिल, गुजरात यांचा समावेश होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. सचिन वाघमारे, मेकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर समितीसमोर उत्तम सादरीकरण करून हे यश मिळविले.
मेकॅनिकल विभाग विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सहशैक्षणिक कामगिरी, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व योगदान अशा सुमारे दहा प्रकारच्या निकषांतर्गत प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विभागातील विद्यार्थ्यांशी सलग्न सोयी सुविधा, प्रथम वर्ष विभाग, प्रशासकीय सेवा सुविधा, संस्था स्तरावरील आधारभूत मदत आणि आर्थिक स्त्रोत याहि गोष्टी सखोल तपासण्यात आल्या. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापाकांप्रती उत्तम आधारशील व सदैव प्रेरणादायी व्यवस्थापणामुळे मेकॅनिकल विभागाला हि उंची गाठणे शक्य झाले आहे असे प्राचार्य महेश भागवत यांनी सांगितले.
राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) काढूनही महाविद्यालयाचे दुस-यावेळी पुनर्मुल्यांकन करण्यात आले होते. त्यामध्येही महाविद्यालयाने बी ++ (बी प्लस प्लस) श्रेणी प्राप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली होती. विशेषकरून कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने यांनी हे महाविद्यालय सुरु केले. महाविद्यालयाने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून या कालखंडामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे. मुल्यांकना दरम्यान एनबीए समितीने महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणारे विवध उपक्रम, कौशल्य विकास योजना, महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर, सौर उर्जा निर्माण प्रकल्प, कॅम्पस प्लेसमेंट, तसेच महाविद्यालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दिमाखदार कामगिरी करणारी टीम एम एच ०८, गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी टीम फुल थ्रोटल या सर्व गोष्टींची विशेष दखल घेऊन प्रशंसा केली.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने यांनी प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व माजी विद्यार्थी व पालकांचे विशेष आभार मानले.