(संगमेश्वर /प्रतिनिधी )
संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये कसबा शास्त्रीपुल येथे चोरटया पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी पोलीस स्टाफसह तात्काळ कसबा शास्त्रीपुल येथे जावून सापळा लावुन ४ आरोपीना मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसानी रंगेहात पकडले आहे.
यामधील आरोपी १)अजय राजेंद्र काणेकर, वय ३८ वर्षे, २) सौ. अक्षरा अजय काणेकर, वय ३६ वर्षे, दोघे रा. असगोली,मधलीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, ३) मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी वय ५६ वर्षे, कसबा शास्त्रीपुल ता. संगमेश्वर, ४) कामील हसन मुल्ला, वय ४८ वर्षे, रा. डिंगणी,मोहल्ला ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी यांना पकडून त्यांचेकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
सदर आरोपी यांचेवर संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ८६/२०२३, अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भा.दं.वि.क. ३४ अन्वये दिनांक ०९/१०/२०२३रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रत्नगिरी धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. गावीत, सपोफौ / ९२५ साळवी, सपोफौ /२४० कांबळे, पोहेकॉ/१४३० कामेरकर, पोहेकॉ/१४०२ जोयशी, पोहेकॉ/७०७ कोलगे, पोना/९०१बरगाले, पोना/१२७३ मनवल, मपोना/१५२५ धामणस्कर, पोकॉ/३९ आव्हाड, पोकॉ/१६२० रामपूरे, व मपोकॉ/१५७३ वसावे यांनी केलेली आहे. अधिक तपास पोनि/- गावीत करीत आहेत