जाकादेवी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊड गावातीलवाडी शाळेमध्ये थोर, आद्य शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन केले.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तद्नंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार , सहाय्यक शिक्षिका महादेवी शिंदे, मोहन बंडगर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय कार्यावर प्रकाशझोत टाकून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्साहाने बहारदार नृत्य सादर करून हा जयंती उत्सव साजरा केला.