५ राज्यांतील निवडणुकांच्या तारखा सोमवारी जाहीर झाल्या आहेत. आयोगाच्या घोषणेनंतर ३ तासात भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील १६२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राजस्थानमधील ४१, मध्य प्रदेशातील ५७ आणि छत्तीसगडमधील ६४ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ही राजस्थानची पहिली, मध्य प्रदेशची चौथी आणि छत्तीसगडची दुसरी यादी आहे. राजस्थानमधील १५९, मध्य प्रदेशातील ९४ आणि छत्तीसगडमधील ५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
मध्यप्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने 57 उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधनीतून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दातियातून, गोपाल भार्गवांना रेहलीतून, विश्वास सारंग यांना नरेलातून आणि तुलसीराम सिलावट यांना सावेर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वी मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 39 उमेदवारांची दुसर्या यादीची घोषणा 25 सप्टेंबर रोजी केली होती. भाजपाने दुसर्या यादीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह काही खासदारांना उमेदवारी दिलीआहे. यात नरेंद्रसिंह तोमर, फग्गनसिंह कुलस्ते आणि प्रल्हादसिंह पटेल यांच्या नावाचा समावेश होता. मागील निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये पराभव झाला, त्या ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा भाजपाने 17 ऑगस्ट रोजी केली होती.