(हैदराबाद)
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड आमने सामने आले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा ८१ धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात नेदरलँडचा खेळाडू बास डी लीडे वन मॅन शो दाखवला. पाकिस्तानला विजयाचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी त्याने अनेक पाय घातला. त्याच्या कामगिरीचे क्रिडा विश्वातून कौतूक होत आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये आज शुक्रवारी दुसरी लढत पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात झाली. या लढतीत प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने २८६ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल नेदरलँडचा डाव ४१ षटकात २०५ धावात संपुष्ठात आला. पाकिस्तानने ही लढत ८१ धावांनी जिंकली.
हा सामना पाकिस्तानने जिंकला असला तरी सोशल मीडियावर मात्र नेदरलँडच्या बास डी लीडेची चर्चा रंगली आहे. या सामन्यात तो पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरला. या सामन्यात त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही दम दाखवला. बास डी लीडेने त्याच्या स्पेलमध्ये ९ षटकात ६२ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. बास डी लीडने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली यांना आपल्या जाळ्यात अडकवत पाकिस्तानच्या फलंदाजी युनिटचे कंबरडे मोडले. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मधल्या फळीत फलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने ६७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
या सामन्यात नेदरलँडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मोहम्मद आणि रिझवान साऊद शकील यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४९ षटकात १० विकेट गमावून २८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडच्या संघाला फक्त २०५ धावापर्यंत मजल मारता आली. यामुळे पाकिस्तानने हा सामना ८९ धावांनी जिंकत विश्वचषक मोहिमेची विजयाने सुरुवात केली.
वर्ल्डकपच्या पदार्पणात ४ विकेट आणि ५० हून अधिक धावा
१) डंकन फ्लेचर- विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४२ धावात ४ विकेट, नाबाद ६९ धावा
२) नील जॉन्सन- विरुद्ध केनिया, ४२ धावात ४ विकेट आणि ५९ धावा
३) बास डे लीड- विरुद्ध पाकिस्तान, ६२ धावा ४ विकेट आणइ ६७ धावा