(हांगझोऊ)
भारताच्या पुरुष कबड्डी संघाने येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीत पदकनिश्चित केले. त्यांनी उपांत्य सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 61-14 असा धुव्वा उडवला व अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता आज (शनिवार, दुपारी १२.३० वाजता) इराण संघाविरुद्ध भारताची अंतिम फेरी रंगणार आहे
One step closer to #AsianGames glory, and we cannot wait 🤩
🇮🇳 takes on its biggest rival 🇮🇷 for the ultimate prize 🥇
Match updates ➡️ https://t.co/cfORnVakqn & the Official Pro Kabaddi App 💻📱#RaidForGlory #Kabaddi #Hangzhou #AsianGames2022 pic.twitter.com/r77Z84TtAX
— ProKabaddi (@ProKabaddi) October 6, 2023
पाकिस्तानविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात पहिल्या क्षणापासूनच भारताने वर्चस्व राखले. पहिल्याच हाफमध्ये भारताने पाकिस्तानवर 30-5 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानने लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, भारताचा बचाव इतका भक्कम होता की पाकिस्तानला संधीच मिळाली नाही. या दुसऱ्या हाफमध्येही बारताचेच वर्चस्व राहिले व पाकिस्तानला दारूण पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे, पुरुष संघासह भारताच्या महिला संघानेही कबड्डीत यश मिळवताना नेपाळचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याची महिला संघाची ही चौथी वेळ ठरली. आहे. त्यामुळे महिला कबड्डी संघाकडूनही एक पदक निश्चित झाले आहे.
शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताने नेपाळचा 61-17 असा दारूण पराभव केला. या लढतीत पुजा हातवाला व पुष्पा राणा यांनी विजयात मोलाचा वाटा घेतला. झारखंडची युवा खेळाडू अक्शीमाने या स्पर्धेत बारताकडून पदार्पण करताना अफलातून खेळ केला.
INTO THE FINALS! 🤩
Our Indian Men's Kabaddi Team with power-packed raids and solid defense, are heading into the FINAL showdown at the #AsianGames2022🔥
Go for GOLD, champs🤩🌟 🇮🇳 is rooting for you all!!#Cheer4India#JeetegaBharat#BharatAtAG22#Hallabol pic.twitter.com/6kGKc41Dy7
— SAI Media (@Media_SAI) October 6, 2023