(खेड / भरत निकम)
लोटे पटवर्धन येथील टपरीत पोत्यात ठेवलेला ७७ हजार ८१४ रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. ही घटना दि. २ रोजी सायंकाळी साडेच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील लोटे पटवर्धन येथील टपरी तपासली असता एक प्लॅस्टिक पिशवी मिळाली होती. ती उघडून तपासली तेव्हा गुटखा असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी मोहम्मद इब्राहिम पलनगिरी हनिफा (४२, रा. विश्वंभर बिल्डींग, लोटेमाळ मुळगाव पालनगीरी, केरळ) याला ताब्यात घेतले. पकडलेल्या पिशवीत व्ही-१ च्या २८८ पुड्या तंबाखूची किंमत ६ हजार ३३६, ३४ पॅकेटमध्ये तंबाखू २० हजार ४००, जी-१ नावाची ४७ पाकीटे १ हजार ४१०, २५२ पॅकेट केशरयुक्त पान मसाला ४७ हजार ८६८, व्ही-१ तंबाखूची ६० पाकीटे १ हजार ८०० असा एकूण ७७ हजार ८१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडलेला आहे.
याप्रकरणी कृष्णा बांगर यांनी तक्रार दाखल केली आहे.