(संगमेश्वर / प्रतिनिधी)
शिवसेना संगमेश्वर तालुका कडवई जि. प. गट तुरळ येथे शिवसेना ठाकरे गटाकडून “होऊद्या चर्चा” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी विविध प्रश्न उपस्थित करत जनतेशी थेट संवाद साधला.
बास झाली तुमची मन की बात… आता ऐका तुम्ही जन की बात… अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागले लागल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले बॅनर जनतेचे लक्ष वेधून घेत होते. सत्तेत येण्यापूर्वी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने कशी फोल ठरत आहे, यावर शिवसेनेने बॅनरबाजी करत होऊ द्या चर्चा! कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅनरबाजीतून काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. यामध्ये पेट्रोल स्वस्त झाले का?, अच्छे दिन आले का? धनगर समजाला आरक्षण मिळाले का? बाबासाहेबांचे स्मारक तयार झाले का? दहशतवाद थांबला का? बुलेट ट्रेन धावली का? शिवस्मारक तयार झाले का ? पंधरा लाख मिळाले का? काळे धन परत आले का ? महागाई कमी झाली का? गंगा स्वच्छ झाली का ? मराठा आरक्षण मिळाले का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एकूणच बॅनरबाजीतून सरकारवर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमात कडवई जिल्हा परिषद गटातील अनेक लोकं उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी जी.प.अध्यक्ष रोहन बने, वेदा फडके, ऐश्वर्या घोसाळकर, संकेत थेराडे, मा. पं सभापती दिलीप सावंत, कडवई सरपंच विशाखा कुवळेकर, तुकाराम येलोंडे (शाखाप्रमुख हरेकर गाव), शांताराम आदावडे (शिवसेना शाखाप्रमुख तुरळ ) मा. सरपंच तुरळ अरविंद जाधव, अनंत उजगावकर, आप्पा फडकले, रामचंद्र हरेकर, रघुनाथ बामणे, सुहास लिंगायत, गणपत हरेकर, अजिंक्य ब्रीद, सागर भोजने, अशोक उजगावकर, संतोष पाचकले, अनंत पाचकले, उपसरपंच तुरळ शांताराम घोटेकर, बाळकृष्ण डिके, संजय कडवईकर, अक्षता घरवेकर, सिकंदर जुवळे, अविस खान आदि मान्यवर उपस्थित होते.