(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने कै. राजेश रघुनाथ भोसले व कै. सुनिल रघुनाथ भोसले यांच्या स्मरणार्थ नवरात्रौत्सवानिमित्त भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक साडेनऊ वाजता श्री भैरी भगवती मंदिर निवेंडकर( खालची ) भगवतीनगर येथे होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या विजेत्या संघाला रोख रूपे 7000 व आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या संघाला रोख रुपये 5000 व आकर्षक चषक तर तृतीय विजेत्या संघाला रोख रुपये 3000 व आकर्षक चषक तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट ताशावादक स्पर्धकाला रोख रक्कम व आकर्षक चषक, उत्कृष्ट ढोल वादक स्पर्धकाला रोख रक्कम व आकर्षक चषक तर उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धकाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अनेक नामांकित ढोलवादक संघ व भगवतीनगर पंचक्रोशीतील संघ सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा खास आकर्षण ठरणार आहे.त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी भगवतीनगर पंचक्रोशी व तालुक्यातील रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी होईल,असा विश्वास श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समिती भगवतीनगरच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते मोठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व संघ नोंदणीसाठी श्री भैरी भगवती सार्वजनिक उत्सव समितीचे कार्यकर्ते सागर भोसले- मो.क्र.9892803651, सिद्धेश तोडणकर -मो.क्र. 9764019713 व अनिकेत सावंत- मो.क्र.9561619861 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.