गिरगाव चौपाटी येथे रविवारी राज्यपाल रमेश बैस, मु‘यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छता ही लोक चळवळ झाली आहे, असे यावेळी एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
आज (सोमवारी) होणार्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला; पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडे बंद झाली. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक‘म नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे. प्रारंभी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी स्वच्छतेची प्रार्थनादेखील घेण्यात आली.
स्वच्छता कागदावर नको
‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्त्वाचे आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसले पाहिजे. आजचा दिवस झाला की संपले, असे नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असे होता कामा नये, असे शिंदे यांनी सांगितले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन शिंदे यांनी केले.
गडकिल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता
राज्यातील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरातही स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसावी म्हणून सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे. मागील 50-60 वर्षांत जे जमले नाही ते पंतप्रधानांनी गेल्या आठ-नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्टाचाराचीही सफाई झाली.