(देवळे /प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील दोन घरांमध्ये वीज घुसून विद्युत उपकरणांचेही नुकसान झालं असून एका व्यक्तीला वीज चाटून गेल्यामुळे विजेचा थोडा धक्का बसला.
रविवारी पडलेल्या मुसळधार पावसातून विज पडून देवळे जंगलवाडी येथील दोन घरांचे विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलवाडी येथील चंद्रकांत सिताराम गोताड व बुधाजी तानू दळवी यांच्या घरावर वीज पडून दोघांचेही विद्युत मीटर जळाले तसेच घरातील पूर्ण वायरिंग जळाले असून टीव्ही फॅन व लाईट ट्यूब अशा सामानाची मोठ नुकसान झाले आहे. तर घरालाही विजेचा धक्का बसला आहे.
बुधाजी दळवी यांच्या घरात वीज घुसल्याने घराची कवले उडाली आहेत. तसेच बुधाजी दळवी यांनाही वीज चाटून गेली. चंद्रकांत गोताड यांच्याही घरात वीज घुसल्याने बाथरूमची भिंत तुटली आहे. आजूबाजूच्या घरांनाही थोडा दणका बसला, नशिबाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन गरीब शेतकऱ्यांचे विद्युत साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिवू शेट्ये यांच्या हॉटेलच्या विद्युत उपकरणांचेही नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी संदेश मांडवकर, चेतन शिंदे, अमित सावंत यांनी त्वरित घटनास्थळी हजर होऊन संबंधित घरांचा वीज पुरवठा बंद केला व किती नुकसान झाले आहे याची माहिती घेतली.