कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे हृद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
कोलेस्टेरॉलचे प्रकार :
कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार आहेत.
1) HDL कोलेस्टेरॉल –
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्याच्या आरोग्यासाठी चांगला असतो. याला सामान्य भाषेत Good Cholesterol असेही म्हणतात. हृद्याच्या उत्तम आरोग्यासाठी HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 50 ते 60 mg/dL पेक्षा जास्त असावे लागते. HDL म्हणजे High Density Lipporotein.
HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे..?
HDL या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण 40 mg/dL पेक्षा कमी असल्यास हृद्यविकार उद्भवण्याची अधिक शक्यता असते. तर HDL चे प्रमाण 60 mg/dL पेक्षा अधिक असल्यास हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
2) LDL कोलेस्टेरॉल –
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्यासाठी अत्यंत घातक असतो. याला Bad Cholesterol असेही म्हणतात. LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा जास्त असल्यास हृद्यविकाराचा धोका निर्माण होतो. LDL म्हणजे Low Density Lipoprotein.
LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे..?
LDL या वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असणे हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
- योग्य प्रमाण – 100 mg/dL पेक्षा कमी
- मध्यम प्रमाण – 100 ते 129 mg/dL पर्यंत
- काठावरील प्रमाण – 130 ते 159 mg/dL पर्यंत
- जास्त प्रमाण – 160 ते 189 mg/dL पर्यंत
- सर्वात जास्त प्रमाण – 190 mg/dL पेक्षा अधिक असणे.
रक्तामध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे :
- विविध विकारांमुळे कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात असामान्यपणे वाढ होते.
- यांमध्ये धमनीकाठिन्यता, Hypothyroidism थॉयरॉईड अक्रियाशील असणे, पित्ताशयाचा सिरोसिस, किडनींचे विकार,
हृद्याचे विविध विकारंमुळे, Heart attacks मुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण असामान्यपणे वाढते. - अधिक सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रांसफॅट्सच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होते.
- अनुवंशिक कारकांमुळे,
- मानसिक ताणतणावामुळे,
- लठ्ठपणा,
- व्यायामाचा अभाव,
- तसेच अनियंत्रित मधुमेहामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची असामान्यपणे वाढ होते.
कोलेस्टेरॉल टेस्ट कोणी करावी..?
उच्चरक्तदाब, स्थुलता, मधुमेह ह्या विकारांनी पीडीत रुग्णांनी नियमित कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घ्यावी. वयाच्या 20 वर्षानंतर प्रत्येकाने दर पाच वर्षातून एकदा लिपिड प्रोफाइल टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे.
या प्रकारे कोलेस्टेरॉलची पातळी करा नियंत्रित
– दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.पोहणे, योगा करणे, धावणे, पिलेट्स, वेट ट्रेनिंग किंवा आठवड्यातून किमान 30 मिनिटे आणि 5 दिवस जॉगिंग.
– निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि सवयी सुधारा.
– फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार घ्या.
– जंक फूडचा वापर कमी करा.
– वेळोवेळी तुमची तपासणी करा.
– धुम्रपान टाळा. धूम्रपान केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी एलडीएल वाढू शकते हे देखील एक ज्ञात सत्य आहे. शिवाय, धूम्रपान सोडल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. डॉक्टरांच्या मदतीने धूम्रपान बंद करण्याच्या थेरपीची निवड करणे चांगले आहे.
– वजन नियंत्रणात राखा. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे असामान्य कोलेस्टेरॉलची पातळी होऊ शकते. ताजी फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, मसूर, तेलबिया आणि काजू यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या आणि जंक फूड, मसालेदार, तेलकट, कॅन केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा.
– लिंबूवर्गीय पदार्थ खा. लिंबूवर्गीय पदार्थ खा जो एलडीएल कमी करतो. ओमेगा -3 फॅटी ऍसिड्सने समृध्द अन्नपदार्थांचे सेवन करा. ओमेगा-३ रक्तप्रवाहात ट्रायग्लिसराइड्स कमी करतात आणि हृदयाची असामान्य लय सुरू होण्यापासून रोखण्यासाठी मदत करून हृदयाचे रक्षण करतात. कार्बोनेट्ड पेय, बेकरी पदार्थ, मिष्टान्न, मिठाई आणि नमकीन यांचे सेवन टाळा. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
- अल्कोहोलचे सेवन टाळा. मद्यपानामुळे उच्च रक्तदाब, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे:
उच्च कोलेस्टेरॉलची काही शारीरिक लक्षणे आहेत, जी शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलची पातळी दर्शवतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा इशारा देतात. उच्च कोलेस्टेरॉलच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढणे ही शरीरासाठी धोक्याची घंटा आहे, कारण त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीज यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.