(मुंबई)
जुन्या हिंदी सिनेमातील गाण्याची आठवण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर ट्वीट च्या माध्यमातून जोरदार निशाना साधला आहे. सुळेंचे हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली आहे. या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे या ट्वीटमध्ये म्हणतात, जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.
जुन्या हिंदी सिनेमातील 'अपनों पे सितम,गैरों पे करम' या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) September 25, 2023
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु, यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही, असा दावाही त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.
पुढे सुप्निया सुळे म्हणतात, नमुद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे.