(खेड)
मुंबई- गोवा महामार्गावरून राष्ट्रीय येणाऱ्या प्रवास सुखकर चाकरमान्यांचा होण्यासाठी कशेडी बोगद्याची एक मार्गिका गणेशोत्सव पूर्वी एकदिशा सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा बोगदा मुंबईकडे जाण्यासाठी चाकरमान्यांना वापरता येणार नसल्याने मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे.
शनिवार, दि. २३ रोजीपासून मुंबईकडे जाण्यासाठी लहान वाहनांची महामार्गावर गर्दी होऊ लागली आहे. कशेडी बोगद्यातून परतीच्या प्रवासासाठी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांकडून केली जात होती.
मात्र, पोलादपूर बाजूला बोगद्यापर्यंत चार पदरी जोड रस्ता तयार नाही व जो रस्ता ठेकेदाराने तात्पुरता बनवला आहे तो जेथे राष्ट्रीय मार्गाला जोडला जातो तिथे अपघाताचा धोका असल्याने कशेडी बोगद्यातून मुंबईकडे जाण्यासाठी वाहने सोडण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कशेडी घाटच पार करून मुंबईकडे जावे लागत आहे.