(रत्नागिरी)
रत्नागिरी ते पावस रस्त्यावर गोळप-नाखवा कॉम्प्लेक्ससमोर झालेल्या दुचाकी अपघातातील त्या स्वाराविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धेश दीपक गुरव असे संशयिताचे नाव आहे. सदर घटना गुरूवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सिद्धेश गुरव दुचाकी (एमएच-०८ एडब्ल्यू ०७०३) घेऊन जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुचाकी (एमएच-०८ एएच ५१२२) जोरदार धडक दिली.
या अपघातात स्वार प्रसाद दीपक मुरकर व मागे बसलेले नारायण वासुदेव चिपळूणकर हे गंभीर जखमी झाले. मुरकर यांना किरकोळ दुखापत झाली तर गंभीर जखमी चिपळूणकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर स्वतः संशयित गुरव जखमी झाला. या प्रकरणी प्रशांत गोविंद लोहळकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अंमलदार करत आहेत.