भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगातील अनेक देशांवर पडल्याचे आपल्या विविध सण, उत्सवांद्वारे अनुभवास येते. खासकरून गणेशोत्सव व गणपती देवतेबद्दल जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड कुतूहल व श्रद्धादेखील आहे. भारताबाहेरही ‘अत्यंत लोकप्रिय असलेली देवता’ असे श्रीगणेशाचे निश्चितच वर्णन करता येईल. त्यामुळेच इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम, जपान आदी अनेक देशांमध्ये विविध आणि आकर्षक गणेशमूर्ती बघायला मिळतात.
गणपतीची सर्वात उंच मुर्ती थायलंड देथालीतल खलॉंग ख्वेन शहरात आहे. खलॉंग ख्वेन शहर चाचॉंग्सओ नावाने देखील ओळखले जाते. हे ‘गणेशाचे शहर’ म्हणून ओळख आहे. ही मूर्ती सुमारे 40 मीटर उंच असून ती पूर्णपणे पितळ धातूपासून बनलेली आहे. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय उद्यानात असून येथे दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक फिरायला येतात.
आठशे पेक्षा जास्त पितळ्याचे तुकडे जोडून मुर्ती
थायलंड मधील ही गणपतीची मुर्ती शंभर वर्षापूर्वी तयार केली गेली असावी असा अंदाज येतो. परंतू तसे नसून ही मुर्ती 2012 मध्ये तयार करण्यात आली. हा पुतळा २००० ते २०१२ दरम्यान तयार करण्यात आला होता. या जागेचे प्रथम उद्यानात रूपांतर झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी या उद्यानात गणेशाची मूर्ती बसविण्यात आली. 800 पेक्षा जास्त पितळाच्या तुकड्यांना जोडून या मुर्तीची निर्मिती केली गेली आहे. गणपतीच्या या मुर्तीबद्दल असे म्हणतात की वादळ, भूकंपामुळे या मुर्तीचे नुकसान होवू नये यासाठी वेगळ्या पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे.
थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानले जाते. थायलंड मधील या गणेश मूर्तीच्या डोक्यावर कमळाचे फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलेले आहे. या मूर्तीला कांस्याच्या 854 वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आले आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला 2008 ते 2012 अशी 4 वर्ष लागली आहेत. थायलंडमध्ये जी 4 फळे पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आले आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळं यांचा समावेश आहे. थायलंडमध्ये आंबा फळाला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. या गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहे, तर सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर असल्याचे दिसत आहे.
थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती का बनवली गेली याचा किस्साही फार महत्वाचा आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचले असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचे शहर 1549 मध्ये वसवण्यात आले होते. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवण्याचा मानस तेव्हा व्यक्त केला होता. तसेच यासाठी त्यांनी जागाही शोधायला सुरूवात केली होती.
चाचोएंगशाओ असोसिएशन संस्थेने यासाठी ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात 40 हजार वर्ग मीटर जागा निश्चित केली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली होती. याच जागेवर अलिकडे सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आले. यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली.
जगातील सर्वात उंच असणारी ही गणेश मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
भारतातील उंच मुर्ती इंदौरला
गणपतीच्या उंच मुर्ती बाबत भारताबद्दल विचार करतांना इंदूरमध्ये स्थित गणपतीची 25 फूट उंच मूर्ती ही भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. 1875 मध्ये या मूर्तीची स्थापना केली गेली. तथापि, बरेच लोक असे मानतात की उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यातही भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती आहे