( लांजा /प्रतिनिधी )
तालुक्यातील गवाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिखल नागरणी स्पर्धेला प्रेक्षक आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत घाटी गटात आसगे येथील रमेश पावसकर तर गावठी गटात संगमेश्वर येथील सुरेश सोलकर यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा ही गवाणे येथील साई मंदिरासमोरील जागेत पार पडली. गवाणे गाव विकास प्रेमी आणि शिवसेना शाखा गवाणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये घाटी गटामध्ये रमेश पावस्कर प्रथम, द्वितीय क्रमांक पालू येथील भारत कांबळे यांच्या बैल जोडीने,चाफवली येथील ऋतिका बोडेकर यांच्या बैलजोडीने तृतीय तर लांजा तालुक्यातील व्हेळ येथील यशवंत शिंदे यांनी चौथा क्रमांक पटकावला. गवाणे येथील प्रभाकर पडवळकर यांनी पाचवा तर कोसुंब येथील सुरज जाधव यांनी सहावा तर मलकापूर येथील निनाई देवी यांच्या बैलजोडीने सातवा क्रमांक पटकावला.
गावठी गटामध्ये सुरेश सोलकर यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मारलेश्वर येथील बाबा गुरव यांनी तर तृतीय क्रमांक पाटगाव येथील जयसांबा प्रसन्न यांच्या बैल जोडीने पटकावला. चौथा क्रमांक लांजा तालुक्यातील देवधे येथील विष्णू दुडये तर पाचवा क्रमांक करंबेळे येथील हरेश मिरगळ यांनी पटकावला. सहावा क्रमांक पाटगाव येथील जयसांबा यांनी तर सातवा क्रमांक आसगे येथील के.जी भारती यांच्या बैल जोडी ने पटकावला. घाटी गटातील प्रथम विजेत्याला रुपये १२००० व चषक, द्वितीय विजेत्याला रुपये ८००० व चषक ,तृतीय विजेत्याला ६००० व चषक, चौथ्या क्रमांकाला ४००० व चषक ,पाचव्या विजेत्याला २००० व चषक आणि सहाव्या व सातव्या विजेत्यांना प्रत्येकी १००० व चषक असे बक्षीस देण्यात आले.
गावठी गटातील प्रथम विजेत्याला रुपये दहा हजार वर चषक, द्वितीय विजेत्याला रुपये ७००० व चषक ,तृतीय विजेताला रुपये ५००० चषक, चौथ्या क्रमांकाला रुपये ३००० व चषक, पाचव्या क्रमांकाला रुपये २००० व चषक ,सहाव्या आणि सातव्या क्रमांकाला प्रत्येक १००० आणि चषक असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.