(देवरूख / प्रतिनिधी)
देवरूख मधील सामाजिक कार्यकर्ते व नगरपंचायतीचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांच्या मातोश्री सुनंदा जयराम भुवड यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
शेतकरी असलेल्या व अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या सुनंदा यांनी जुन्या काळात शिक्षणासाठी बाहेर गावातून देवरूखात येणार्या विद्यार्थ्यांना अडचणी समजून घेत मदतीचा हात देत असत. त्या गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी आम. सुभाष बने, राष्ट्रवादीेचे बाबा साळवी, माजी उपनगराध्यक्ष अभी शेट्ये, बबन गांधी. बारक्याशेठ बने याचेसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्यदर्शन घेतले त्यांच्यावर चर्मालय येथील स्म्शानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात १ मुलगी. २ मुलगे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी दि.२६ रोजी तर १२वे विधी दि.२८ रोजी त्याचे राहत्या घरी भुवड काँलनी येथे होणार आहे.