(लांजा)
तालुक्यातील विवली, केळंबे येथील महिलेने विषारी औषध प्यायल्याने अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतीक्षा प्रकाश खानविलकर (वय ५९, रा. विवली, केळंबे, लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १३) सायंकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक्षा यांनी विषारी औषध पिले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे