(खेड / भरत निकम)
खेड रेल्वे स्टेशन नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हि घटना बुधवारी, पहाटे ५ च्या सूमारास लक्षात आली. मयत तरुण उमाकांत माझी असून तो ओरिसा घासडूमर येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भोस्ते विराचीवाडी येथील रेल्वे ट्रॅक पाॅईंट नंबर १२० चे जवळ तरुणाचा मृतदेह रेल्वेच्या ट्रकच्या कडेला पडलेल्या अवस्थेत होता. प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेतून पडून त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. कोकण रेल्वे कर्मचारी यांनी याची माहिती स्टेशन प्रमुख यांना दिली होती. तेथून पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. हा तरुण रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेमधून पडला होता. तो उमाकांत माझी (वय २१) असून तो घासडूमर, ओरीसा येथील आहे, अशी माहिती मिळवली होती. तो मृतदेह ताब्यात घेवून तो उत्तर्णीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे पाठवून दिला आहे.