(रत्नागिरी / वार्ताहर)
जाधव फिटनेस ॲकेडमी ही नाम फाँडेशनच्या विचारधारेने प्रेरीत होऊन काम करत असून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. सदर मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा या उददेशाने वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत.
मुख्य कार्यक्रम पाहता मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवशी जेष्ठ नागरिक, वॉर्डातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी शिर्डी, अक्कलकोट अशा धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. सहल पूर्णपणे मोफत असून अशा किमान 10 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाड्यावरत तिन्ही बाजूंनी बँनर लावून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
ॲकेडमीचे अध्यक्ष भैय्याशेठ सांमत असल्यामुळे त्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असल्याचे संचालक हेमंत जाधव यांनी सांगितले.
मराठा समाज राजकारणी लोकांवरती नाराज झालेला जाणवतो. त्या मराठा समाजाला एकत्र करून या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भव्य मराठा शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धा मराठा समाजातील मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मराठा समाज मर्यादित व सर्व सामान्य मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ओपन अशा दोन भागात स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाला नाना पाटेकर यांच्या सारख्या मान्यवरांना आणण्याचा प्रयत्न ॲकेडमी करणार आहे. यावेळी अन्नदानाचे पुण्य मिळावे म्हणून सर्वांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली जाणार असून त्यांच्या वाढदिवसाचा प्रत्यक्ष समाजाला उपयोग व्हावा म्हणून आथिकदुषटया मागासवर्गीय, विधवा महिला, कँन्सरग्रस्त, खेळाडू व मुलांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून 5 हजार ते 10 हजार रोख स्वरूपात दिले जाणार आहेत. अशा कार्यक्रमाचे नियोजन ॲकेडमी दरवर्षी करणार असून समाजामध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा ॲकेडमीचे डायरेक्टर हेमंत जाधव यांनी सांगितले.