(लखनऊ)
सीबीआयने ईशान्य रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक के.सी. जोशी यांना लाचखोरी प्रकरणात अटक केली असून त्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. अधिकारी गोरखपूरमध्ये नियुक्तीवर होते. या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता घरातून तब्बल २.६१ कोटी रुपये जप्त करण्यात आले.
तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल ईशान्य रेल्वे गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक यांना सीबीआयने अटक केली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. कंत्राटदाराने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) कडे तक्रार केली होती की, त्याची कंपनी ईशान्य रेल्वे (एनईआर) ला उत्पादने आणि सेवा पुरवते आणि त्याला तीन ट्रक पुरवठा करण्याचे कंत्राट करारानुसार मिळाले होते, ज्यासाठी त्याला रु. दरमहा 80,000 रुपये मिळणार होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने (कंत्राटदाराने) आरोप केला की केसी जोशी यांनी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) वेबसाइटवरून आपल्या फर्मची नोंदणी रद्द करण्याची आणि करार संपुष्टात आणण्याची धमकी देऊन तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने या आरोपाची पडताळणी करून केसी जोशींना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला. याबाबत सीबीआयचे अधिकारी म्हणाले की, ‘या प्रक्रियेत जोशी यांना पकडण्यात आले, त्यानंतर गोरखपूर आणि नोएडा येथील त्यांच्या घर आणि संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली, जिथे सीबीआयला तब्बल 2.61 कोटी रुपयांची रक्कम रोख सापडली.
सीबीआयने सापळा रचून तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच घेताना आरोपी केसी जोशीला याला रंगेहाथ पकडले. गोरखपूर आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेची झडती घेण्यात आली. जिथे सीबीआयला रु. 2.61 कोटी (अंदाजे) आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी केसी जोशीला लखनऊ येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे