(संगमेश्वर / प्रतिनिधी)
दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी सामानाची यादी वाचत असताना चक्क चोरट्याने हातसफाई करुन १५ हजार रुपये लांबवले. हा प्रकार संगमेश्वर बाजारपेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात ११ सप्टेंबर रोजी दुपारी १:५५ वाजता घडली.
फिर्यादी यांचे करबुडें (ता. रत्नागिरी) येथे दुकान आहे. दुकानात लागणारे साहित्य आणण्यासाठी ते संगमेश्वर येथील एका हार्डवेअरच्या दुकानात गेले होते. सामान खरेदीसाठी शर्टच्या वरील खिशात ठेवलेली डायरीतल सामानाची यादी त्यांनी काढली. ही यादी दुकानदाराला वाचून दाखवित असताना त्यांच्या डायरीतील १५ हजार रुपये चोरट्याने लांबवले