(खेड / भरत निकम)
नातूनगर येथील पाटबंधारे खात्याच्या १ आणि २ गोडावून मधील १ लाख २९ हजार ३०० रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे. हि घटना १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लक्षात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या नातूनगर येथे गोडावून नं. १ आणि नं. २ असे बंदिस्त आहेत. गोडावूनमध्ये कालव्याच्या कामासाठी लागणारे आवश्यक साहित्य ठेवण्यात आले होते. यात लोखंडी जाड साखळ्या, दगड फोडण्यासाठी घन, गाडीचा जॅक आणि लोखंडी स्क्रु टाईप गेट असे किंमती साहित्य ठेवलेले होते. हे गोडावून १० सप्टेंबर रोजी उघडण्यासाठी कर्मचारी गेले. तेव्हा आतील साहित्य नसल्याचे दिसून आले. यामध्ये साडेचार किलो वजनाचे ३२ घन त्यांची किंमत ३ हजार २००, सहा फूट लांबीच्या व अर्धा इंच जाडीच्या २२ लोखंडी साखळ्या किंमत १९ हजार ८००, एक लोखंडी जॅक किंमत एक हजार ३०० आणि लोखंडी स्क्रु टाईपचे सात नग गेट किंमत १ लाख ५ हजार असा एकूण १ लाख २९ हजार ३०० चा माल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३८०, ४५४ व ४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे