(पुणे)
भारतीय रग्बी संघटना (रग्बी इंडिया), भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटना आणि मित्सुबिशी महामंडळाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 31-10 असा पराभव करून करून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संघाकडून सोमनाथ जाधव (11गोल), सुरेंद्र कासूरे(7गोल), अॅग्नेल नायडू(9गोल), अँथोनी जॉन(4गोल) यांनी गोल केले.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अॅग्नेल नायडू(11गोल), सोमनाथ जाधव(8गोल), सुरेंद्र कासुरे( 3गोल) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने बिहारसंघाचा 22-13 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात कर्नाटक संघाने हरियाणा संघाचा 9-7 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत बिहार संघाने हरियाणा संघाचा 13-5 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. बिहार संघाकडून दीपक शर्मा( 3गोल), दीपक कुमार सिंग(3गोल), शैलेश कुमार(3गोल) आणि राजीव कुमार(4गोल) यांनी गोल केले. स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रग्बी इंडियाचे सीईओ अंकुश अरोरा आणि भारतीय व्हिलचेअर रग्बी संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिवाजी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्य फेरी:
कर्नाटकः 9 (मंजुनाथ एलएच 3, श्रीकांत देसाई 5, महांतेश होंगल 1) वि.वि.हरियाणा: 7(राजा एस 3, संदीप 3, रमेश कुमार 1)
महाराष्ट्र: 22 (अॅग्नेल नायडू 11, सोमनाथ जाधव 8, सुरेंद्र कासुरे 3)वि.वि.बिहार: 13(दीपक शर्मा 3, शैलेश कुमार 3, धीरज कुमार 3, राजीव कुमार 4)
अंतिम फेरी: महाराष्ट्र: 31 (सोमनाथ जाधव 11, सुरेंद्र कासूरे 7, अॅग्नेल नायडू 9, अँथोनी जॉन 4) वि.वि. कर्नाटक: 10 (मंजुनाथ एलएच 4, नादीश बीएन 2, महांतेश होंगल 1, श्रीकांत देसाई 3)
3ऱ्या व 4थ्या क्रमांकासाठी लढत:
बिहार: 13 (दीपक शर्मा 3, दीपक कुमार सिंग 3, शैलेश कुमार 3, राजीव 4) वि.वि.हरियाणा: 5 (राजा एस. 5)