(नवी दिल्ली)
सोमवारी रात्री आसामसह इतर राज्यात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते. अचानक जमिन हदारल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पळाले. रात्री ११ च्या सुमारास हा भूकंप आला असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.१ तीव्रता नोंदवली गेली. या भूकंपामुळे जीवित हानी तसेच वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारजवळ मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यापासून 66 किमी अंतरावर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उखरुल, मणिपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता 5.1 होती. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 20 किमी खोलीवर होता.
Earthquake of Magnitude:5.1, Occurred on 11-09-2023, 23:01:49 IST, Lat: 24.40 & Long: 94.77, Depth: 20 Km ,Location: 66km SSE of Ukhrul, Manipur, India for more information Download the BhooKamp App https://t.co/eDrlOH7MOU @Dr_Mishra1966 @moesgoi @KirenRijiju pic.twitter.com/ohjSXOUh5R
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) September 11, 2023