(खेड / भरत निकम)
खेड शहरातील पाटीदार भवन येथे खेड शिवसेना तालुका संघटनेची आढावा बैठक शिवसेना प्रवक्ते आणि आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आमदार योगेश कदम यांनी उपस्थित सर्वांशी विविध विषयांवर संवाद साधला. शिवदूतांच्या नेमणुका, नवीन मतदारांची नोंदणी, विकास कामांच्याबाबत गावागावांमध्ये माहिती देणे, शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठका आयोजित करणे. यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करून आगामी काळात संघटना बळकट करण्यासाठीचे मार्गदर्शन सर्व उपस्थितांना केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका संघटक महेंद्र भोसले, माजी सभापती सौ. सुप्रिया पवार आदिंसह शिवसेना दापोली विभागाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.