जाकादेवी वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-मासेगाव मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजनानुसार काम सुरू असून या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असताना या ठिकाणी दिशादर्शक किंवा ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रक येथे उपलब्ध नसल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. कामगारच ट्राफिक पोलीसचे काम करत राहिल्यामुळे वाहन चालकांना योग्य दिशा मिळत नसल्याने वाहतुकीस मोठा खोळंबा निर्माण होत आहे.
निवळी- मासेगाव मार्गावरील मुख्य रस्त्यावरचे दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथे संबंधित विभागाचा वाहतूक नियंत्रक अथवा सक्षम यंत्रणा उभारली जावी अन्यथा अपघातजन्य स्थिती व वाहन चालकांत वादग्रस्त प्रसंग उद्भवू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. रात्री या मार्गावरून चालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवावरची कसरतच करावी लागत आहे. दिवस रात्र येथे वाहतूक नियंत्रक असावा अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.