(रत्नागिरी)
शहरातील साळवी स्टॉप येथील एका शेडच्या कडेला आणि रहाटाघर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ९) दुपारी १:५५ वाजता करण्यात आली.
राकेश प्रभाकर फगरे (३२, रा. वरचा फगरवठार, रत्नागिरी), महेंद्र भालचंद्र मायनाक (६२, रा. मांडवी, रत्नागिरी) अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी दुपारी पोलिस रहाटाघर, शिरगाव ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालत असताना ही कारवाई केली. साळवी स्टॉप येथील एका शेडच्या बाजूला आणि रहाटाघर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला संशयित जुगार खेळ चालवताना दिसले. त्यांच्याकडून एकूण १,२५५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला