(दापोली / सलिम रखांगे)
गणेशोत्सव, ईद ए मिलाद या धार्मिक सण उत्सवांसह आगामी काळात येणारे सर्वच सण उत्सव आनंदाने उत्साहात साजरे करताना आपल्या तालूक्यात असलेली शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहून तालूक्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शनिवारी बैठक संपन्न झाली. दापोलीत जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मोहल्ला कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता कमेटी सदस्य, राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थितांशी संवाद साधत येणा-या गणेशोत्सव, ईद ए मिलाद आदी धार्मिक सण उत्सव साजरे करताना कुठेही धार्मिक जातीय राजकिय सामाजिक कटूता येवून येथे असलेला सामाजिक धार्मिक जातीयेतेच्या शांततेचा सलोखा बिघडून परस्परामध्ये कटूता येवू नये कटूता आल्याने त्याचे सर्वांनाच भोगावे लागणारे दिर्घ परिणाम भोगावे लागू नयेत यासाठी समजदारीने सण उत्सव साजरे करावेत आणि सण उत्सवांचा उत्साह अधिक व्दिगुणित करावा अशाप्रकारचे मार्गदर्शन जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दापोलीतील बैठकीत उपस्थितांना केले.
यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी डाॅ. अजित थोरबोले, दापोलीच्या कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार अर्चना बोंबे (घोलप), डीवायएसपी राजेंद्र मुणगेकर, दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विवेक अहिरे, दापोलीचे गटविकास अधिकारी आर.एम. दिघे आदींसह दापोली तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.