(रत्नागिरी)
को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन रत्नागिरीची वार्षिक सर्वसाधारण सभा काल रविवार दि. १०/०९/२०२३ रोजी दु.१२.३० वा. जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे युनियनचे अध्यक्ष खा.श्री. आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सदरील सभेला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, दापोली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, एस.टी. को ऑपरेटिव्ह बँक, कोकण मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, पी.एम.सी. बँक व अपना बँकेतील संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.
सदरील युनियनचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे साहेब यांना इंटेलेच्युअल पिपल्स फाऊंडेशन, दिल्ली यांचेतर्फे “Best Chairman Performance Award for Co-operative Bank Development” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. अडसूळ यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करणेत आला. तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेचे कार्यतत्पर कार्यकारी संचालक श्री. चव्हाण यांना बँकेच्या कार्यकारी संचालक पदी काम करणेसाठी १ वर्षाची मुदतवाढ मिळाल्याबद्दल श्री.अडसूळ यांचे हस्ते सत्कार करणेत आला. त्याचप्रमाणे खो-खो या खेळामध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या व “शिवछत्रपती पुरस्कार २०२१-२२” पुरस्कार विजेत्या कु. अपेक्षा अनिल सुतार व कु. आरती अनंत कांबळे यांचा पारितोषिक देवून सत्कार करणेत आला.
सदरील सभेमध्ये युनियनचे दि.०१/०१/२०२२ ते दि. ३१/१२/२०२२ या कालावधीतील जमाखर्च पत्रकास सभासदांकडून मान्यता देणेत आली. सदरील सभेमध्ये युनियनचे सल्लागार श्री. नरेंद्र सावंत यांनी बँकेच्या कर्मचारी वर्गाला एकच युनिफॉर्मबाबत आपले मत व्यक्त करून बँकेचे अधिकारी यांनी ग्राहकांना तत्पर सेवा देणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
त्यानंतर सदरील सभेमध्ये युनियनचे कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी यांनी प्रास्ताविक करतांना जिल्हा बँकेमध्ये बँक व युनियन यांचेदरम्यान स्टॅडींग ऑर्डर लागू करणेबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. तसेच दापोली अर्बन बँक व राजापूर अर्बन बँकेमध्ये कराराची मुदत संपली असल्याने नवीन डिमांडचे मागणीपत्र देणेबाबतची कामकाज सुरु असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दापोली अर्बन बँकेमध्ये बँक संचालक कर्मचारी प्रतिनिधी यांना बैठक भत्ता देत नसल्याने याबाबत कोर्टामार्फत उचित कार्यवाही करणेत येणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर शेवटी श्री. अडसूळ यांनी अध्यक्षपर भाषण करतांना बँकेच्या अधिकारी/कर्मचारी वर्गाने नियोजन पध्दतीने आपले कामकाज करणे गरजेचे असून बँकेची प्रगतशील वाटचाल कशी होईल याबाबत मार्गदर्शन केले. या सभेला युनियनचे अध्यक्ष श्री. अडसूळ, कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी, सल्लागार श्री. नरेंद्र सावंत, जनरल सेक्रेटरी श्री. जितेंद साळवी, श्री.दरेकर, श्री. पार्टे, श्री. काळे, श्री. चोगले, श्री. अमोल साळवी, श्री नरेश कदम, श्री. दिलीप लाड, श्री. कुणाल दाभोळकर व युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदरील सभेचे सुत्रसंचालन श्री. रविंद्र रजपूत यांनी करुन युनियनच्या सौ. सान्वी कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.