(गुहागर)
बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चाकाविरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना रविवार, ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. विजापूर-गुहागर माहामार्गावरील चिखली कदमवाडी येथे घडली होती. नितीन यशवंत पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात हनुमंत राजाराम नलावडे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, रविवारी रात्री नितीन पवार हा शृंगारतळी येथून कामावरुन आपल्या ताब्यातील दुचाकीवरून भरधाव वेगाने गुहागर विजापूर महामार्गाने मुंढर गावी जात होता. रात्री ११ वा. सुमारास तो चिखली कदमवाडी येथे आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे