तुम्ही एसीचा भरपूर वापरदेखील कराल आणि मोठ्या जबरदस्त वीजबिलातूनही तुमची सुटका होऊ शकते कारण बाजारात सोलर एसी आले आहेत. यांचा वापर करण्यासाठी वीजेची आवश्यकता नाही.
उन्हाळ्याची सुरूवात झाली की ठंड पाणी, आईसस्क्रिम, कूलर आणि एसी यांची गरज भासायला लागते. किंबहुना या वस्तूंचा खप वाढला म्हणजे उन्हाळा सुरू झाल्याचे लक्षात येते. उष्णतेपासून सुटकेसाठी एसीचा सर्वत्र वापर केला जातो. मात्र एसी लावण्यातील सर्वात मोठी अडचण असते ती एसीमुळे येणाऱ्या जबरदस्त वीजबिलाची. त्यामुळे एसी अनेंकाच्या आवाक्याबाहेर असतो. कितीही सांभाळून वापर करायचे म्हटले तरी वीजबिलावर नियंत्रण ठेवता येत नाही. मात्र आता या वीजबिलाच्या प्रश्नावर उत्तर सापडले आहे.
मनसोक्त वापर एसी ( AC)
तुम्ही एसीचा भरपूर वापरदेखील करू शकाल आणि मोठ्या आकड्यांच्या वीजबिलांपासूनही तुमची सुटका होईल, असा पर्याय आता बाजारात उपलब्ध झाला आहे. बाजारात सोलर एसीची एन्ट्री झाली आहे. या एसीला चालवण्यासाठी वीजेची आवश्यकता नसते. यामध्ये एसीला सोलर प्लेटशी जोडले जाते. हे सोलर एसी, वीजेवर चालणाऱ्या एसीच्या तुलनेत महाग असतात मात्र दीर्घकालीन विचार करता यात तुमच्या पैशांची बचत होते. सोलर एसीची वैशिष्ट्ये आणि याचा वापराबद्दल जाणून घेऊया.
९० टक्के वीजेची बचत
बाजारात १ टन, १.५ टन आणि २ टनाच्या क्षमतेचे सोलर एसी उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुरुप एसी विकत घेऊ शकतो. सोलर एसीमुळे वीजेची बचत होते. स्प्लिट एसी किंवा विंडो एसीच्या तुलनेत सोलर एसीमुळे ९० टक्क्यांपर्यत वीज बचत होऊ शकते. जर तुम्ही एसीचा सर्वसाधारण किंवा नॉर्मल वापर केला तर महिनाभरात नेहमीचा एसी ३०० युनिट खर्च करतो. म्हणजेच एका महिन्यासाठीचे एसीचे वीजबिल २,००० रुपयांपेक्षा अधिक असेल. तर सोलर एसीमुळे तुमची उष्णता आणि वीजबिल दोघांपासून सुटका होते. सोलर एसी जर व्यवस्थित वापरला तर तुम्हाला कदाचित १ रुपयाचाही खर्च येणार नाही. म्हणजेच सोलर एसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि वीज बिलापासून कायमची सुटका मिळवा.
सोलर एसीची किंमत
सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे सोलर एसी उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांच्या किंमती जवळपास सारख्याच आहेत. नेहमीच्या एसीप्रमाणेच सोलर एसीचे स्पेअरपार्ट असतात. फक्त सोलर एसीमध्ये सोलर प्लेट आणि बॅटरी जोडलेली असते. एक टनाच्या (१५०० वॅट सोलर प्लेट) एसीची किंमत ९७,००० रुपये तर १.५ टन एसीची किंमत १.३९ लाख रुपये आणि २ टन एसीची किंमत १.७९ लाख रुपये इतकी असते. सुरूवातीला हा खर्च जास्त वाटेल मात्र दीर्घ कालावधीसाठी तुमची वीजबिलाच्या खर्चातून सुटका होईल.
सोलर एसी जितका जास्त टनाचा असेल तितकीच जास्त वॅटची सोलर प्लेट त्यात लागते. सोलर प्लेटला इनव्हर्टर आणि बॅटरीशी जोडले जाते. सुर्यप्रकाशाने सोलर प्लेट एनर्जी निर्माण करतो. त्यातून बॅटरी चार्ज होते. ही बॅटरी एसीवरच चालते. शिवाय एखाद्या दिवशी सुर्यप्रकाश उपलब्ध जरी नसला तरी चिंतेचे कारण नसते कारण एसी बॅटरीवर चालतो.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !