( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
आगामी लोकसभा महाडमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. नुकतेच येथील संत शिरोमणी रोहिदास महाराज सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ आयोजन आढावा बैठकीचे करण्यात आले होते. यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीसाठी मनसे नेते संदीप देशपांडे, खेड तालुक्यातील सुपुत्र सरचिटणीस वैभव खेडेकर व सौ. स्नेहल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तीनही मान्यवरांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेतल्या तसेच येणाऱ्या सर्व आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या आदेशानुसार सज्ज राहण्याच्या सूचना यावेळी उपस्थित सर्वांना दिल्या.
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार लोकसभेच्या काही मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असून या अंतर्गत पक्ष बांधणी, रिक्त पदाधिकारी नियुक्त्या आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन मतदारसंघ बांधणी करण्याचे काम सध्या सुरू आहे असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसेतर्फे वैभव खेडेकर नावाची चर्चा असल्याने याविषयी खेडेकरांना छेडले असता सध्या उमेदवार कोण हा विचार न करता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना आम्ही देत आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी देवेंद्र गायकवाड, सुबोध जाधव दिलीप सांगले, अमोल पेणकर, चेतन उतेकर यांसह महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग मुरुड, इत्यादी ठिकाणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.