(रत्नागिरी)
फुंणगूस खाडीपट्यामध्ये एसटी आगाराच्या मनमानी कारभारामुळे एसटी नेहमीच उशिराने धावत आहेत. यामुळे त्याचा फटका शाळेतील विद्यार्थी तसेच काॅलेजच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचेही हाल होत आहेत. 06.00 वाजता येणारी संगमेश्वर फुंणगूस डिंगणी पिंरदवणे एसटी 7.40 ला फुंणगूस मध्ये आली. रात्रीचे वेळी मुलींना धोका जास्त होण्याचा संभव जास्त आहे. एसटी उशिरा येण्याबाबतचा स्थानिक विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आगार व्यवस्थापक यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे. या प्रकरणा बाबत आगार व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात येऊन निवेदन देण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव व फुणगुसचे महासंघाचे संगमेश्वर तालुका सक्रिय कार्यकर्ते श्री सुभाष लांजेकर यांनी सांगितले.