(देवळे / प्रकाश चाळके)
संंगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द जिल्हा परिषद गटातील साडवली गावातील तरूणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून नुकताच शिवसेनेत (शिंदे गट) पक्षप्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश किरण सामंत व शिवसेनेचे संंगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तर कासारकोळवण गावचे माजी सरपंच सचिन मांगले यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला. शुभम धने (ओझरेखुर्द जि. प गट युवासेना विभागप्रमुख), निखिल मोहिरे, आशु डोंगरे, बंटी मोहिरे, राजकुमार डोंगरे, ऋषिकेश साळवी, राकेश साळवी, आम्या मोहिरे, विवेक रानभरे, अक्षय धने यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उदय सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे, विभागप्रमुख नित्यानंद देसाई, सचिन मांगले, प्रसाद सावंत, राजू सावंत, बाळा माने आदि. उपस्थित होते