( खेड / भरत निकम )
वेरळ गोवळकरवाडी येथील गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर पोलीसांनी धाड टाकून ३ हजार ५१० किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. हि घटना शनिवारी रात्री ८ च्या सूमारास घडली.
खेड तालुक्यातील वेरळ गोवळकरवाडी येथील राजेंद्र रामचंद्र सुतार (वय ४८) हा घराच्या समोरील भागात गावठी हातभट्टी दारुचा धंदा करीत होता. पोलीस काॅन्स्टेबल रुपेश जोगी यांनी तिथे धाड टाकून २० लीटर क्षमतेचे पांढरा आणि पिवळ्या रंगाचे दोन कॅन, ग्लास असा ३ हजार ५१० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पोलिस दप्तरी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.