(जाकादेवी /संतोष पवार)
रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडापटू कु. राज अजित धामणे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून या विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. राज धामणे हा अकरावी वाणिज्य शाखेत शिकत असून त्याला विद्यार्थी दशेपासूनच क्रीडा स्पर्धेची आवड आहे.तो विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो. यावर्षी जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याने जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावल्याने या विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
कु.राज धामणे याला क्रीडाशिक्षक श्री.संतोष सनगरे, क्रीडाशिक्षिका सौ. मनिषा धोंगडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले,तर मुख्याध्यापक श्री.नामदेव वाघमारे , पर्यवेक्षक शाम महाकाळ यांची प्रेरणा मिळाली. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या राजचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.सुनिल उर्फ बंधू मयेकर, व्हा.चेअरमन श्री. विवेक परकर, कोषाध्यक्ष श्री.संदीप कदम , सचिव श्री. विनायक राऊत, जाकादेवी विद्यालयाचे सीईओ व संस्थेचे संचालक श्री.किशोर पाटील यांनी खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.