(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ कुणबीवाडी येथील जि.प.शाळा नं.२ मध्ये गुरूवार दि.३१ ऑगस्ट रोजी मान्यवरांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुजित साळवी यांनी केले .शाळेसाठी वेळोवेळी योगदान देत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आगरनरळ ग्रामपंचायत सरपंच अनुष्का खेडेकर यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रूपाली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग गोताड यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमातील सत्कार मूर्ती सुरेश सुर्वे व शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये गुणवत्ता यादीत आलेली समृद्धी ठोंबरे हिचा सत्कार आगरनरळच्या सरपंच अनुष्का खेडेकर व माजी पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर यांच्या हस्ते तसेच शाळा व कुणबीवाडी पालक, ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर समृद्धीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका अंजली पाटील यांचा सत्कार सरपंच अनुष्का खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कुणबी विकास प्रतिष्ठान आगरनरळचे अध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे , शिक्षक प्रतिनिधी पांडुरंग गावडे ,विद्यार्थी प्रतिनिधी चेतना हळदे ,समृद्धी गोताड यांनी आपली मनोगत व्यक्त केले .तसेच प्रमुख पाहुणे अभय खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अनुष्का खेडेकर यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या समृद्धी ठोंबरे चे कौतुक व अभिनंदन केले तसेच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच अगरनरळ कुणबीवाडी नं ०२ या शाळेतून सुरेश सुर्वे यांची बदली झाल्याने त्यांना सदिच्छा दिल्या व नव्याने या शाळेत रुजू झालेले श सुजित साळवी यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या वर्षाताई गोताड ,ग्रामपंचायत सदस्या श्रेयाताई गोताड ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग गोताड, उपाध्यक्षा सौ रूपाली सावंत, इतर सदस्य ,पालक, प्रतिष्ठित ग्रामस्थ ,अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कल्पना दडस यांनी केले तर आभार सौ अंजली पाटील यांनी मानले.